पॅरिसमधील संरक्षण प्रदर्शनात भारतीय संरक्षण क्षेत्रातील कंपन्या सहभागी होत आहेत. ‘Eurosetary 2024’ असे नाव असलेल्या या प्रदर्शनात पिनाका मल्टी-बॅरेल रॉकेट प्रक्षेपक प्रणाली आणि एलसीए तेजस लढाऊ विमान यासारखी भारतीय उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत. सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनांपैकी हे एक प्रदर्शन आहे.
फ्रान्समधील भारतीय राजदूत जावेद अश्रफ यांनी सोमवारी, १७ जून रोजी या प्रदर्शनातील भारतीय मंचाचे उद्घाटन केले. यावेळी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे संचालक मनोज जैन आणि के. व्ही. सुरेश कुमार, ब्रिगेडियर झुबीन भटनागर, फ्रान्समधील भारताचे संरक्षण संलग्न आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व देश त्यांचा संरक्षण खर्च वाढवण्याचा विचार करत आहेत, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली.
(हेही वाचा – Nagpur Airport Bomb Thret: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; ‘AAI’ला आला मेल, प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ )
सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांतील प्रमुख ११ भारतीय कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. डीआरडीओकडून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर प्रणाली’ हे भारताच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या प्रदर्शनात भारतीय संरक्षण क्षेत्रातील एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम, एलसीए तेजस, अस्त्र व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्रेदेखील प्रदर्शनाकरिता ठेवण्यात आली आहे. भारताने यापूर्वी आपल्या मित्र देशात या शस्त्रांची निर्यात केली आहे.
यशस्वी हवाई संरक्षण प्रणाली…
अर्जुन मेन बॅटल टॅंक आणि व्हिल्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म यांसह वरुणास्त्र हेवी वेट टॉरपीडो, अशी यशस्वी हवाई संरक्षण प्रणालीही या प्रदर्शनात आहे. निबे डिफेन्स, भारत फोर्स यासारख्या इतर लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या संख्येने भारतीय खासगी क्षेत्रातील कंपन्यादेखील या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.
हेही पहा –