पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे माजी प्रमुख फैज हमीद (Faiz Hameed) यांना सोमवारी (12 ऑगस्ट) लष्कराने ताब्यात घेतले आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांच्यावर पाकिस्तान आर्मी ॲक्टच्या तरतुदीनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशनने (ISPR) ने दिलेल्या माहितीनुसार, फैज हमीदला लष्करी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर टॉप सिटी हाऊसिंग स्कीम घोटाळ्याप्रकरणी कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
(हेही वाचा –Munawar Faruqui: मनसेच्या इशाऱ्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा)
हमीद (Faiz Hameed) 2019 ते 2021 या कालावधीमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे प्रमुख होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार फैज अहमद यांच्या विरोधात टॉप सिटी केस प्रकरणातील अनेक तक्रारींचा तपास करण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानं एक चौकशी समिती स्थापन केली होती. त्या चौकशीमध्ये फैज अहमद यांच्या विरोधात अनेक प्रकरणं समोर आले आहेत. फैज अहमद यांनी निवृत्तीनंतरही सैन्यातील अनेक नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
(हेही वाचा –कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार; दिल्लीतील Doctor जाणार संपावर)
पाकिस्तान आर्मीकडून एप्रिल महिन्यात ही समिती स्थापन केली होती. पाकिस्तानच्या इतिहासात गुप्तचर संघटनेच्या माजी प्रमुखांना अटक करुन त्यांच्यावर कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरु होण्याची ही पहिलीच घटना आहे. (Faiz Hameed)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community