ब्रिटनची राजधानी लंडनमधील हीथ्रो विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले. विमानतळाजवळील एका विद्युत उपकेंद्रात आग लागल्याने विमानतळाचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. यामुळे १३०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे २ लाख ९१ हजार प्रवाशांवर परिणाम झाला आहे. पश्चिम लंडनमधील हेस येथे आग लागली. यामुळे ५,००० हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. (Fire News)
हेही वाचा-Nagpur Violance : नागपूरचा हिंसाचार पूर्वनियोजित ! मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
सुमारे १५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. ७० अग्निशमन दलाच्या जवानांसह लंडन अग्निशमन दलाने बहुतेक आग आटोक्यात आणली. मात्र, आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. (Fire News)
हेही वाचा- मुंबईतील सर्व जाहिरात फलकांचे तीन महिन्यात लेखापरीक्षण; मंत्री Uday Samant यांची माहिती
ब्रिटनचे दहशतवाद विरोधी पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सबस्टेशनला लागलेल्या आगीमागे काही वाईट हेतू होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. (Fire News)
१० दिवसांपूर्वी ३,४०० उड्डाणे रद्द
९ मार्च रोजी जर्मनीतील सर्व विमानतळांच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला. यामुळे सोमवारी (भारतीय वेळेनुसार) देशभरातील हवाई प्रवास थांबला. या संपामुळे देशभरातील १३ प्रमुख विमानतळांवरील ३,४०० उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात फ्रँकफर्ट आणि म्युनिक सारख्या प्रमुख विमानतळांचा समावेश आहे. यामुळे ५ लाखांहून अधिक प्रवाशांना फटका बसला. (Fire News)
हेही वाचा- विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांच्याकडून शासनाची कानउघडणी!
देशात २५ लाख सरकारी कर्मचारी असलेल्या वर्डी युनियनने पगारवाढीच्या मागणीसाठी हा संप पुकारला होता. जर्मन वेळेनुसार, हा संप १० मार्चपासून सुरू होणार होता, परंतु तो नियोजित वेळेच्या एक दिवस आधी सुरू करण्यात आला. (Fire News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community