पंजाबच्या भठिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. गोळीबार झाल्यावर या संपूर्ण परिसराला सील करून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर परिसरात प्रवेश करण्यात मनाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, प्रवाशांची होणार गैरसोय)
भठिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये पहाटे ४.३० वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला आहेय मिलिट्री कॅम्प सील करून सध्या सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे, असे सैन्याच्या दक्षिण पश्चिम कमांडने जारी केले आहे.
हा गोळीबार नेमका कुणी केला, असे करणारे लोक आर्मी कॅन्टोन्मेंट परिसरातील आहेत की, बाहेरील लोकांनी हा गोळीबार केला याबाबत अजूनपर्यंत काहीच अधिकृत माहिती पुढे येऊ शकलेली नाही. या घटनेनंतर सैन्याने हा संपूर्ण परिसर सील करून सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे. या परिसरात सर्व गतिवीधी थांबवून ड्रोनच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. या परिसरातील बँका आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
https://twitter.com/ANI/status/1646010910362812416?s=20
Join Our WhatsApp Community