पूर्व लडाखमधील भारत-चीन (India, China) सीमेवर भारतीय लष्कराकडून गस्त घालण्याची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. डेमचोक (Demchok) आणि डेपसांग (Depsang) भागात १ नोव्हेंबरपासून पेट्रोलिंग सुरू झाली आहे. दोन्ही भागात एकदा भारतीय सैनिक आणि एकदा चिनी सैनिक गस्त घालत आहेत. गस्तीसाठी मर्यादित सैनिकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. हा आकडा किती आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. (India, China)
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काय म्हणाले ?
पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये (India, China) चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या वाटाघाटीनंतर, 21 ऑक्टोबर रोजी दोन्ही सैन्याने डेपसांग आणि डेमचोकमधून माघार घेण्याचा करार झाला. LAC वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असल्याचे सांगितले होते. पुढील पायरी म्हणजे तणाव कमी करणे. हा तणाव तेव्हाच कमी होईल जेव्हा भारताला खात्री होईल की चीनलाही तेच हवे आहे. तणाव कमी झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर चर्चा केली जाईल. (India, China)
रिजिजू यांचा चिनी सैनिकांशी संवाद
संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी अरुणाचल प्रदेशातील बुमला खिंडीत चिनी सैनिकांशी संवाद साधला. रिजिजू यांनी याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रिजिजू यांनी एलएसीवरील हवामान आणि परिस्थितीबद्दल विचारले – उंचावर काही समस्या नाही का? त्यावर चिनी सैनिकांनी त्यांना कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. यावर रिजिजू म्हणतात की जर काही अडचण असेल तर ऑक्सिजन सिलेंडर असेलच. चिनी सैनिकांनी हवामानाशी जुळवून घेतल्याचे सांगितले. रिजिजू यांचे हे संभाषण भारतीय जवानांच्या माध्यमातून झाले. (India, China)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community