LoC वरील गोळीबाराच्या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटिंग

144
LoC वरील गोळीबाराच्या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटिंग
LoC वरील गोळीबाराच्या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटिंग

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेवर (LoC) तणावाच्या पार्श्वभूमीवर, आज (21 फेब्रु.) पूंछ सेक्टरमध्ये भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) फ्लॅग मिटिंग (Flag meeting ) होणार आहे. गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांमधील ही पहिलीच बैठक असेल. शेवटची फ्लॅग मिटिंग २०२१ मध्ये झाली होती.

हेही वाचा-Investigation Bureau च्या मदतीसाठी ‘टॅलेंट बँक’ तयार करणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

४ फेब्रुवारी रोजी लष्कराने ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारले होते. १३ फेब्रुवारी रोजीही पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या अनेक आठवड्यांपासून तणाव आहे. ११ फेब्रुवारी रोजी, संशयित दहशतवाद्यांनी जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) हल्ला केला. यामध्ये एका कॅप्टनसह दोन सैनिक हुतात्मा झाले होते. (LoC)

हेही वाचा-Mumbai Airport वर १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

२५ फेब्रुवारी २०२१ पासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धबंदी लागू आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाकिस्तानने सीमेपलीकडून आपले नापाक कारस्थान वाढवले ​​आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानने बॉर्डर अॅक्शन टीम म्हणजेच BAT सक्रिय केले आहे. यामागे पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था आयएसआय असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जात आहे की बॅट टीम हल्ल्याचा कट रचत आहे. (LoC)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.