Bangladesh मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक !

84
Bangladesh मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक !
Bangladesh मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक !

हिंदूंवर सातत्‍याने होत असलेल्‍या हिंसाचाराविरोधात अखेर बांगलादेश (Bangladesh) सरकारने कारवाई सूरु केली आहे. उत्तर बांगलादेशातील सुनमगंज जिल्ह्यातील हिंदू समुदायाची घरे आणि दुकाने तसेच स्थानिक लोकनाथ मंदिराची तोडफोड व नुकसान केल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी शनिवारी (14 डिसेंबर) चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणी 12 जणांव्यतिरिक्त पोलिसांनी 150 ते 170 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Bangladesh)

हेही वाचा-Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमध्ये कोणते नवे चेहरे असणार?

अलीम हुसेन (19), सुलतान अहमद राजू (20), इम्रान हुसेन (31) आणि शाहजहान हुसेन (20) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. त्यांना सुनमगंज जिल्ह्यातील दोराबाजार परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे. (Bangladesh)

हेही वाचा-Maharashtra Weather: अनेक ठिकाणी पारा घसरला! ‘या’ ठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद

3 डिसेंबर रोजी बांगलादेशातील सुनमगंज जिल्ह्यातील आकाश दास (Akash Das) याने एक फेसबुक पोस्ट केली होती. आकाश दासच्या फेसबुक पोस्टमुळे जिल्ह्यात तणाव निर्माण झाला. आकाशने ती पोस्ट डिलीट केली, पण समाजकंटकांनी पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात हिंसाचार उसळला. (Bangladesh)

हेही वाचा-Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेच्या ‘या’ १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; Bharat Gogawale यांची माहिती

ढाकाच्या वृत्तानुसार, बांगलादेश पोलिसांनी फेसबुकवर वादग्रस्‍त पोस्ट करणार्‍या आकाश दासला याला ताब्यात घेतले होते. या पोस्‍टमुळे समाजकटकांनी त्याचदिवशी त्याला पोलीस कोठडीतून ताब्‍यात घेण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तातडीने दुसर्‍या तुरुंगात हलवण्यात आले. त्याच दिवशी जमावाने हिंदू समाजाची घरे, दुकाने आणि स्थानिक लोकनाथ मंदिराची तोडफोड करून नुकसान केले. पोलिस अधीक्षक, उपायुक्त आणि लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. (Bangladesh)

हेही वाचा-ED raids; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई; १३० कोटींची मालमत्ता जप्त

5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्‍कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार तेथे सत्ता काबीज केली. यानंतर बांगला देशमध्‍ये हिंदूंवरील हल्‍ल्‍यांमध्‍ये अचानक वाढ झाली. हिंदू आणि विशेषत: इस्कॉन सदस्यांना लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश पोलिसांनी बांगलादेश समिष्ट सनातनी जागरण जोत संघटनेचे प्रवक्ते हिंदू साधू चिन्मय कृष्ण दास (Chinmay Krishna Das) यांनाही अटक केली होती. ते अजूनही कारागृहात आहेत. (Bangladesh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.