हॉकफोर्स, पोलिस आणि नलक्षवादी (Naxalite) यांच्यात बुधवारी, १९ फेब्रुवारीला चकमक झाली, त्यावेळी चार जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्या. या महिला नक्षलवाद्यांवर ६२ लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीत ठार झालेल्या चारही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी गुरुवारी, २० फेब्रुवारीला बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आशा कान्हा भोरमदेव (एरिया कमेटी कमांडर), शीला, रंजीता, लख्खे कान्हा भोरमदेव अशी चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या चारही महिला नक्षलवादी (Naxalite) छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. या चकमकीची माहिती देताना पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले गढी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्पजवळ १९ फेब्रुवारी रोजी ही चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी पळून गेले. या जंगलात हॉकफोर्स, पोलिस विभागाचे १२ पथकातील जवळपास ५०० जवानांचा समावेश होता. यात चार महिला नक्षलवादी ठार झाल्या तर काही नक्षलवादी (Naxalite) जखमी झाले असून ते घनदाट जंगलाचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
Join Our WhatsApp Community