संरक्षण दलांच्या सायबर स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाने चौकट निश्चित करण्याला मंजुरी दिली. संरक्षण दलांची माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान विषयक मालमत्ता यांचा बचाव तसेच संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या सायबर युद्ध सामग्रीवर होणाऱ्या शत्रूच्या हल्यांना अटकाव करण्यासाठी संरक्षण विषयक सायबर संस्था तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यासाठी स्वतंत्र सायबर गटांची स्थापना करण्यात आली आहे.
या सर्व संस्थांनी देशाच्या संरक्षण दलांच्या ‘सायबर सुरक्षा विषयक स्थिती’मध्ये खालील बाबतीत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यात मोठे योगदान दिले आहे :
सायबर गट आणि राष्ट्रीय सायबर संस्था यांच्यात अधिक उत्तम समन्वय
- अधिक मजबूत तंत्रज्ञान, परिणामकारक निरीक्षण, सुरक्षित पद्धती, वापरकर्त्याची अधिक सुधारित जागरुकता, प्रमाणित प्रक्रिया आणि लेखा परीक्षण विषयक उपाययोजना यांच्या वापरातून माहितीच्या संरक्षणासाठी अधिक उत्तम संरक्षणात्मक उपाय
- धोका असणारे केंद्रीकृत माहितीचे साठे, ग्रंथसंग्रह आणि घटनांच्या नोंदी यांच्या वापरातून होऊ शकणाऱ्या घटनांना संलग्न प्रतिसाद देण्यासह सायबर हल्ल्यांना प्रतिसाद देण्यासाठी उत्तम सज्जता.
- संसद सदस्य वंगा गीता विश्वनाथ आणि कोथा प्रभाकर रेड्डी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी ही माहिती दिली.
( हेही वाचा: विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच )
Join Our WhatsApp Community