फ्रान्समध्ये सेंट-ट्रोपेझ येथे १६ ते २३ जून २०२४ या कालावधीत झालेल्या ४३व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धांमध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या (AFMS) चार अधिकाऱ्यांनी विक्रमी ३२ पदके जिंकून भारतासाठी गौरवास्पद कामगिरी बजावली आहे. आरोग्य व्यावसायिकांसाठी भरवल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक, मेजर अनिश जॉर्ज, कॅप्टन स्टीफन सेबॅस्टियन आणि कॅप्टन डॅनिया जेम्स या अधिकाऱ्यांनी १९ सुवर्ण पदके, ९ रौप्य पदके आणि ४ कांस्य पदके जिंकून इतिहास रचला.
(हेही वाचा – माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार, Eknath Shinde यांची ग्वाही)
विजयी कामगिरी पुढीलप्रमाणे आहे:
लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक व्हीएसएम, ५ सुवर्ण पदके, मेजर अनिश जॉर्ज, ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदके, कॅप्टन स्टीफन सेबॅस्टियन, ६ सुवर्णपदके, कॅप्टन डॅनिया जेम्स, ४ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य पदके
सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी या अधिकाऱ्यांचे नेत्रदीपक कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे आणि भविष्यात त्यांच्याकडून आणखी गौरवास्पद कामगिरी घडावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जागतिक क्रीडा स्पर्धा विकसित झाल्या
आरोग्य व्यावसायिकांसाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धा या वैद्यकीय समुदायातील सर्वात प्रतिष्ठित जागतिक क्रीडा स्पर्धा म्हणून विकसित झाल्या आहेत. सन १९७८ पासूनचा वारसा असलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये दरवर्षी ५० पेक्षा जास्त निरनिराळ्या राष्ट्रांमधून 2500 हून अधिक खेळाडू सहभागी होतात.
भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांची कामगिरी केवळ त्यांची श्रेष्ठता अधोरेखित करत नाही, तर जागतिक स्तरावर आरोग्यसेवा व्यावसायिकांचे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील कामगिरीद्वारे त्यांचे समर्पणदेखील दर्शविते. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो डॉक्टर आणि परिचारिकांना राजदूत बनण्यासाठीही प्रेरणा मिळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community