Rafale in India : फ्रेंच कंपनी करणार भारतात राफेल निर्मिती; कुठे असेल प्लॅंट ?

फ्रान्समधील कंपनीची असेंबली लाइन एका वर्षात केवळ 24 विमाने तयार करू शकते. त्यामुळे, करार पूर्ण करण्यासाठी कंपनीला आणखी एक असेंबली लाइन आवश्यक आहे.

227
Rafale in India : फ्रेंच कंपनी करणार भारतात राफेल निर्मिती; कुठे असेल प्लॅंट ?
Rafale in India : फ्रेंच कंपनी करणार भारतात राफेल निर्मिती; कुठे असेल प्लॅंट ?

राफेल या प्रगत लढाऊ विमानांची निर्मिती करणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनला भारतात उत्पादन युनिट सुरू करायचे आहे. (Rafale in India) भारतीय हवाई दलाला 36 विमानांचा पुरवठा केल्यानंतर डसॉल्ट एव्हिएशनने नौदलासाठी 26 ‘राफेल एम’ साठी करार केला आहे. नागपूरजवळ मिहान येथे सुरू असलेल्या संयुक्त उपक्रम सुविधेचे राफेलसाठी असेंब्ली लाइनमध्ये रूपांतर करण्याच्या शक्यतेवर फ्रेंच अधिकाऱ्यांनी चर्चा केली. डसॉल्टला काही वर्षांत जगभरात 200 हून अधिक राफेलचा पुरवठा करावा लागणार आहे. परंतु फ्रान्समधील कंपनीची असेंबली लाइन एका वर्षात केवळ 24 विमाने तयार करू शकते. त्यामुळे करार पूर्ण करण्यासाठी कंपनीला आणखी एक असेंबली लाइन आवश्यक आहे. (Rafale in India)

(हेही वाचा – Israel Hamas War : इस्त्रायली सेनेला मोठं यश; एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर ठार)

कंपनीच्या अधिकार्‍यांनी भारतात नवीन असेंब्ली लाईन उभारण्याची शक्यता तपासण्यासाठी भारत सरकारशी चर्चा केली आहे. भारतात नवीन असेंब्ली लाइन स्थापित झाल्यास, कंपनी एका वर्षात 48 विमानांचा पुरवठा करू शकेल. तसेच 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. फ्रान्समधील असेंबली लाईनमध्ये सध्या 12,700 कर्मचारी आहेत. भारत सरकारने 114 मल्टी रोल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. डसॉल्ट या डीलवर लक्ष ठेवून आहे. या डीलची किंमत 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. मात्र ही विमाने कोणाकडून खरेदी करायची याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. (Rafale in India)

या संदर्भात फ्रेंच कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर हे कंपनीच्या इतर काही अधिकाऱ्यांसह भारतात आले होते. त्यांनी संरक्षण आस्थापनातील उच्च पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. (Rafale in India)

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.