गडचिरोलीत 13 नक्षलवादी ठार! 

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. पोलिस स्टेशनपर्यंत नक्षलवादी पोहोचल्याने पोलिसांना सतर्क व्हावे लागत आहे.  

प्रातिनिधीक छायाचित्र 

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-60 पोलिस पथकाने 13 नक्षलवाद्यांना ठार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी, २१ मे रोजी पहाटेच कोम्बिंग ऑपरेशनसाठी निघालेल्या पोलिस पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद  गोळीबार सुरु केला. त्यामुळे झालेल्या चकमकीत पोलिस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे.

एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्यावर केलेला हल्ला   

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलिस विभागाला मिळाली होती. त्यानुसार पहाटे सी-60 पोलिस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते. नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचे चित्र आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. त्याचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलिस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणे ही मोठी घटना मानली जाते. पोलिस स्टेशनपर्यंत नक्षलवादी पोहोचल्याने पोलिसांना सतर्क व्हावे लागत आहे.

(हेही वाचा : नक्षलवादाच्या भावाची नक्षलींकडून गोळ्या झाडून हत्या)

नक्षलवाद्यांचा महाराष्ट्राकडे वळला मोर्चा 

कालच गडचिरोली येथेच अटकेत असलेल्या नक्षलवाद्यांच्या भावाची नक्षलवाद्यांनी घरात घुसून त्याला जंगलात नेवून गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यामुळे नक्षलवादी यांनी महाराष्ट्रात कारवाया सुरु केल्या आहेत, याचे संकेत मिळत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here