Israel-Hamas conflict: युद्धविराम असूनही, गाझाजवळील इस्त्रायली गावांमध्ये क्षेपणास्त्र इशारा

140
Israel-Hamas conflict: युद्धविराम असूनही, गाझाजवळील इस्त्रायली गावांमध्ये क्षेपणास्त्र इशारा
Israel-Hamas conflict: युद्धविराम असूनही, गाझाजवळील इस्त्रायली गावांमध्ये क्षेपणास्त्र इशारा

इस्रायल आणि हमास (Israel-Hamas conflict) यांच्यातलं युद्ध गेल्या दीड महिन्यांपासून सुरू होतं. कतारने मध्यस्थी केल्यानंतर या युद्धाला ४ दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून (स्थानिक वेळेनुसार, सकाळी १० वाजता) या संघर्षाला पहिला ब्रेक देण्यात आला.

इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हमासबरोबरच्या युद्धविरामाच्या काही मिनिटांतच, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीजवळच्या दोन गावांमध्ये सायरन वाजवले आणि हमास-शासित एन्क्लेव्हमधून पॅलेस्टिनींनी क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारा दिला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यामुळे युद्धबंदीची मागणी करत निदर्शनेही करण्यात आली होती तसेच गाझाच्या हमास- प्रशासित पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये ऑपरेशन आयर्न स्वॉर्डस् सुरू करण्यात आले. दोन्ही बाजूंचे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत.

(हेही वाचा – Israeal-Hamas Conflict: मानवतावादी समस्यांकडे लक्ष द्या, इस्रायल-हमास युद्धाविषयी भारताच्या प्रतिनिधींची स्पष्ट भूमिका)

युद्धविराम लागू झाल्यानंतर टेलिग्रामद्वारे जाहीर करण्यात आले की, सैन्याचे एकमेकांवर होणारे हल्ले थांबवण्यात येतील तसेच एका प्रवक्त्याने ही बंदी तात्पुरती आहे, असे म्हटले आहे. एका व्हिडियो संदेशाद्वारे सांगण्यात आले आहे की,  प्रवक्ता अबू उबैदा यांनी सर्व विरोधी आघाड्यांवर इस्रायलशी संघर्ष वाढवण्याचे आवाहन केले आहे.

आय. डी. एफ. ने जाहीर केले की, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या नौदल दलातील एक वरिष्ठ कार्यकर्ता अमर अबू जलालाह याला ठार केले. हा कार्यकर्ता समुद्राद्वारे अनेक दहशतवादी हल्ल्यांचे दिग्दर्शन करण्यात गुंतलेला होता. गुप्तचर-समर्थित मोहिमेत हमासच्या नौदल दलातील एक अज्ञात अतिरिक्त कार्यकर्तादेखील मारला गेला.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.