जनरल मनोज पांडे यांनी भारतीय सैन्याचे 29 वे लष्करप्रमुख म्हणून शनिवारी पदभार ग्रहण केला. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या निवृत्तीनंतर जनरल मनोज पांडे यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. सैन्य उपप्रमुख म्हणून काम केलेले जनरल पांडे हे दलाच्या इंजिनीअर कॉर्प्समधून लष्करप्रमुख होणारे पहिले अधिकारी ठरले आहेत. प्रामुख्याने ते सैन्याच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. ही कमांड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे.
अद्याप नवीन मुख्य संरक्षण प्रमुखाची नियुक्ती नाही
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आव्हानांसह भारताला असंख्य सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत असताना, नौदल आणि हवाई दलाशी समन्वय साधावा लागेल, अशा वेळी जनरल पांडे यांनी लष्कराची कमान सांभाळली आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, जे थिएटर कमांड तयार करण्याचे काम करत होते, त्यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. सरकारने अद्याप नवीन मुख्य संरक्षण प्रमुखांची नियुक्ती केलेली नाही.
(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दुसऱ्या दिवशीही दिलासा नाही, आता फैसला सोमवारी)
General Manoj Pande today took over as Chief of Army Staff from General Manoj Mukund Naravane. He is the 29th Army Chief and the first officer from the Corps of Engineers to get this opportunity. pic.twitter.com/tfRqFU9Jsa
— ANI (@ANI) April 30, 2022
लेफ्टनंट जनरल पांडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अंदमान निकोबार कमांडचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. अंदमान आणि निकोबार कमांड ही भारतातील तिन्ही सैन्यांची एकमेव कमांड आहे. पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत आणि डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि विविध भागात बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम दरम्यान नियंत्रण रेषेजवळ एका अभियंता रेजिमेंटचे नेतृत्व केले. तसेच पश्चिम लडाखच्या उंच प्रदेशातील पर्वतीय विभाग आणि ईशान्येकडील एका सैन्यदलाचेही नेतृत्व केले.
Join Our WhatsApp Community