सैनिक होऊ पाहणा-या इच्छुक मुलींसाठी महत्त्वाची बातमी असून, आता सैनिक होण्यासाठी कुठे बाहेर जावे लागणार नाही. कारण नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिक सेवा प्रशिक्षण संस्था मंजूर झाली आहे. यात प्रवेश घेण्यासाठी शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजरू करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये एनडीए (NDA) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र शासनाने सन 2021 मध्ये घेतला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा, या हेतूने महाराष्ट्र शासनामार्फत 1977 मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था स्थापन झाली.
( हेही वाचा: मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणार विशेष ट्रेन; जाणून घ्या सविस्तर )
नागपूर हिवाळी अधिवेशनात मान्यता
केंद्राच्या धोरणानुसार, पुणे येथील प्रबोधनीत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलींचा प्रवेश व्हावा, या हेतूने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण खात्याचा मंत्रीपदाचा कार्यभार असताना, त्यांनी नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्थेसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावाला मान्यता देत, लवकरच नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण मिळणार आहे. भारतीय सीमेवर सैनिक म्हणून महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून 2023 पासून शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवा प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहेत.
Join Our WhatsApp Community