भविष्यात महिलाही भारताच्या होणार लष्करप्रमुख!

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिच्या १४१ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा खेत्रपाल मैदानावर पार पडला.

119

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आता मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. त्यांचे मनमोकळेपणाने स्वागत करण्यात यावे. या निर्णयामुळे भविष्यात भारताच्या लष्करप्रमुख पदी एखादी महिला अधिकारी दिसू शकेल, असा विश्वास भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला.

एनडीएमध्ये मुलांप्रमाणेच मुलींनाही दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. मुलींना प्रवेश देण्यासाठी एनडीएत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण झाल्यावर त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल आणि एनडीएमध्ये अनोखे दृश्य दिसेल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिच्या १४१ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा खेत्रपाल मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लष्करप्रमुख उपस्थित होते. यावेळी एनडीएचे कमांडन्ट असित मिस्त्री, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख जे.एस. नैन, अभिनेते नाना पाटेकर यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा : बांगलादेशातील हिंदूंसाठी संघाचा पुढाकार! थेट केंद्राला ‘आदेश’)

काय म्हणाले नरवणे? 

एनडीऐचे प्रवेशद्वार महिलांसाठी खुले झाले आहे. ज्या पद्धतीने पुरुष छात्रांचे स्वागत प्रबोधिनित केले जाते, त्याच पद्धतीने जल्लोषात आणि उत्साहात समान भावनेने महिला छात्रांचेही स्वागत करा, अशी अपेक्षा आहे. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग सेंटरमध्ये जा पद्धतीने महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांना एकत्रित प्रशिक्षण दिले जाते त्याच पद्धतीने प्रबोधिनीतही प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्या महिन्यात संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाला माहिती देत महिला उमेदवारांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देणारी अधिसूचना पुढील वर्षी मेपर्यंत निघेल असे सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षापर्यंत वाट न पाहता या वर्षीच नोव्हेंबर महिन्यात एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार आमची तयारी सुरु आहे. आज तुम्ही सशस्त्र दलांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश करणार आहात. विविध गणवेश तुम्ही परिधान करणार आहात. परंतु नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की सशस्त्र दलाची कोणतीही एक सेवा स्वतःहून आधुनिक युद्धे लढू शकत नाही आणि जिंकू शकत नाही. त्यामुळे एकत्रीतपणे लढण्याच्या दृष्टीने तयारी करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.