बदलत्या वातावरणानुसार आणि हवामान विभागाने सूचित केल्यानुसार जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवृष्टीमुळे महाराष्ट्राचे सुपुत्र महेंद्र भाषकर पारधी यांचा बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाला आहे.
( हेही वाचा : ‘टू फ्रंट वॉर’साठी 200 लढाऊ विमानांचा तुटवडा, हवाई दलाकडून ही मागणी )
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात चिरेखणी येथे राहणारे महेंद्र पारधी हे मराठा रेजीमेंटमध्ये कार्यरत होते. मात्र जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे महेंद्र पारधी यांचा बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाला आहे. महेंद्र यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी त्यांच्या स्वगावी येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. महेंद्रच्या मृत्युमुळे त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.
Join Our WhatsApp Community