Gorewada Zoo : बर्ड फ्लूमुळे वाघ आणि बिबट्याचा झाला होता मृत्यू; प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना

50
Gorewada Zoo : बर्ड फ्लूमुळे वाघ आणि बिबट्याचा झाला होता मृत्यू; प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना
Gorewada Zoo : बर्ड फ्लूमुळे वाघ आणि बिबट्याचा झाला होता मृत्यू; प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना

गोरेवाडा (Gorewada Zoo) रेस्क्यू सेंटरमध्ये (Gorewada Rescue Center) तीन वाघांना उपचारासाठी आणण्यात आले होते. हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. या चौघांचा मृत्यू कसा झाला याचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या अवयवांचे नमुने भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत (Bhopal Veterinary Laboratory) पाठवण्यात आले होते. (Gorewada Zoo)

वाघ आणि बिबट्याचा मृत्यू H5N1 मुळे
तीन वाघ (Tiger) आणि एका बिबट्याचा (Leopard) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या अवयवांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू H5N1 मुळे म्हणजे बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. (Gorewada Zoo)

बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना
वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानंतर इतर प्राण्यांना लागण होऊ नये, त्यासाठी प्राण्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण झाली की नाही? यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. H5N1 मुळे वाघाच्या मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. (Gorewada Zoo)

वनमंत्री गणेश नाईक काय म्हणाले ?
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गणेश नाईक यांनी म्हटले आहे की, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांना चंद्रपूरला बोलावले आहे. कोंबडीच्या मटणातून त्यांना ही लागण झाली अशी प्राथमिक माहिती आहे. याची सत्यता तपासली जाईल. खाद्य तपासून द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणीसंग्रहालयाला दिलेल्या आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. (Gorewada Zoo)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.