पंजाबच्या पठानकोटमध्ये आर्मी कॅम्पजवळ सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी एक ग्रेनेड स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट धीरापूल स्थित आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ झाला. आर्मी गेटजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी आर्मी कॅम्पच्या गेटजवळ ग्रेनेड फेकला. यावेळी गेटजवळूनच एक वरात जात होती.
स्फोटानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला. दरम्यान, पठाणकोटच्या सर्व पोलिस चौक्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले. पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिकदृष्ट्या ग्रेनेडच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. या स्फोटात कुणीही जखमी झाल्याची अद्याप माहिती नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ग्रेनेडचे काही भाग जप्त केले आहेत.
(हेही वाचा नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विशाखापट्टनम! काय आहेत वैशिष्ट्ये?)
२०१६ मध्येही पठाणकोटमध्ये झालेला हल्ला
पठाणकोट हे सुरक्षेच्यादृष्टीने भारताच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. या भागात हवाईदलाचे स्टेशन, सेनेचा दारुगोळा डेपो आणि दोन आर्मर्ड ब्रिगेड आणि आर्मर्ड युनिट्स आहेत. जानेवारी २०१६ मध्येही दहशतवाद्यांनी वायुसेनेच्या स्टेशनवर हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात आठ जवान हुतात्मा झाले होते. तर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाच दहशतवादी ठार झाले होते.
Join Our WhatsApp Community