Gujarat: भारतीय तटरक्षक दलाच्या ALH हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ३ क्रू मेंबर बेपत्ता

98
Gujarat: भारतीय तटरक्षक दलाच्या ALH हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ३ क्रू मेंबर बेपत्ता
Gujarat: भारतीय तटरक्षक दलाच्या ALH हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ३ क्रू मेंबर बेपत्ता

भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) गुजरातच्या (Gujarat) पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सापडले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार क्रू मेंबर्स होते. हेलिकॉप्टरमधील 4 पैकी 3 क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत. एकाची सुटका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. ही घटना सोमवारी (2 सप्टेंबर) सकाळी घडली होती. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?
ICG ने मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी 10:12 वाजता अपघाताची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर पोरबंदर किनाऱ्यापासून 45 किमी अंतरावर बचाव मोहिमेसाठी गेले होते. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि दोन ड्रायव्हर होते. एकाची सुटका करण्यात आली आहे. (Gujarat)

सोमवारी रात्री 11 वाजता हेलिकॉप्टर मोटार टँकर हरी लीलावरील जखमी कामगाराला वाचवण्यासाठी गेले होते. कामगाराला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मोटार टँकरजवळ जात असताना त्याचे इमर्जन्सी हार्ड लँडिंग करून ते किनाऱ्याजवळ पडले. बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाने 4 जहाजे आणि 2 विमाने पाठवली आहेत. एएलएचने अलीकडेच गुजरातमधील पूरग्रस्त भागातील 67 लोकांना वाचवले होते. (Gujarat)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.