भारत-पाकिस्तान रेल्वे ट्रॅकवर (India-Pakistan Railway Track) एक हँड ग्रेनेड सापडला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अटारी रेल्वे स्थानकानजीक (Attari Railway Station) हा हँड ग्रेनेड आढळून आला. पोलिसांनी हा हातगोळा जप्त करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे 2019 पासून भारज-पाकिस्तान दरम्यानची समझौता एक्स्प्रेस (Samjhauta Express) बंद झाली आहे.
(हेही वाचा – Madhya Pradesh High Court ने माहिती आयुक्तांना ठोठावला ४० हजारांचा दंड)
यासंदर्भातील माहितीनुसार हा ग्रेनेड रोडावली या सीमावर्ती गावाजवळ सापडला. या ठिकाणापासून पाकिस्तानची सीमा थोड्या अंतरावर आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की जप्त केलेला हँड ग्रेनेड (Hand grenade) बराच जुना आहे, परंतु त्याची नेमकी स्थिती आणि धोक्याची पातळी तपासली जात आहे. ग्रेनेड सापडल्यानंतर पोलिस आणि बॉम्ब निकामी पथक (Bomb disposal squad) घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
हा बॉम्ब किती जुना आहे आणि तो येथे कसा पोहोचला हे पाहिले जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार थांबल्यानंतर हा रेल्वे मार्ग बराच काळ बंद आहे. अशा परिस्थितीत या भागात ग्रेनेडची उपस्थिती चिंतेचा विषय बनली आहे. हा ग्रेनेड येथे कसा आला आणि तो कोणत्या उद्देशाने टाकण्यात आला याचा तपास पोलिस आणि सुरक्षा संस्था करत आहेत. या घटनेनंतर, रेल्वे ट्रॅक आणि आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी केली जात आहे. (India-Pakistan Railway Track)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community