हरियाणातील करनाल येथून ४ संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या चौघांकडून पोलिसांनी हत्यारं, दारूगोळा हस्तगत करण्यात आले आहेत. हे चौघेजण नांदेडला जात होते. दिल्ली, महाराष्ट्रात मोठा कट घडवून आणणार असल्याचा कट होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेली एक पावडर आरडीएक्स असण्याची शक्यता आहे. चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल याच्याशी संबधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी आयबी, पंजाब पोलीस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे २० ते २५ वर्ष असून हे लोकं पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडच्या दिशेने जात होते.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘वसंता’ने अखेर सोडले मौन; म्हणाले, “साहेबांच्या आदेशानंतर…”)
Haryana | Karnal Police detains four terror suspects, recovers a large cache of explosives
Details awaited. pic.twitter.com/4p06SH67tf
— ANI (@ANI) May 5, 2022
तीन कंटेनरमधील अडीच किलो स्फोटके जप्त
पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली होती. मुख्य रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान, ५ मे रोजी पहाटे ४ वाजता बस्तारा टोल प्लाझाजवळ इनोव्हा वाहनातील चार तरुण पकडले गेले. यातील तीन फिरोजपूरचे तर एक लुधियाना येथील रहिवासी आहे. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भूपिंदर अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. या सर्वांकडून एक पिस्तूल, सुमारे अडीच डझन काडतुसे आणि तीन कंटेनरमधील अडीच किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
तपासात कट उघड झाला
कर्नालचे एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात या तरुणांचा मुख्य हस्तक हरविंदर सिंग उर्फ रिंडा पाकिस्तानात बसल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान असे आढळून आले की, जप्त केलेली शस्त्रे आणि स्फोटके खलिस्तानी दहशतवादी रिंदा याने पाकिस्तानातून फिरोजपूरला ड्रोनद्वारे पाठवली होती. यानंतर अटक केलेल्या तरुणांना मोबाईलद्वारे लोकेशन पाठवण्यात आले. ही शस्त्रे आणि स्फोटके कोठे नेणार होती, याची माहिती अटक तरुणांनाही नव्हती, कारण ते मोबाईलवर पाठवलेल्या लोकेशनच्या आधारे फिरत होते, असे पुनिया यांनी सांगितले.
तेलंगणा आणि महाराष्ट्रात स्फोटके पोहोचवली जाणार होती
या तरुणाने यापूर्वीही स्फोटके एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या ठिकाणाच्या आधारे तेलंगणा सीमेवरील एक शहर आणि महाराष्ट्रातील नांदेड येथे वाहतूक केली जाणार होती. बॉम्ब निकामी पथकाने स्फोटके नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. हे स्फोटक आरडीएक्स असू शकते, ज्याचा एफएसएल पथकांकडून तपास सुरू आहे. अधिक स्फोटके असल्याच्या संशयावरून रोबोच्या मदतीने संशयितांच्या वाहनाची झडती घेण्यात आल्याचे पुनिया यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेली शस्त्रे आणि स्फोटकांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या घटना घडल्या असत्या.
Join Our WhatsApp Community