पुणे (Pune) जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये 4 प्रवासी होते, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
(हेही वाचा –Shakib Al Hasan : बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनवर खूनाचा गुन्हा दाखल)
दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह तीनही प्रवाशी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पायलट बोलण्याच्या मनस्थितीत नाही. सदर हेलिकॉप्टर मुंबईहू हैदराबादच्या दिशेला जात होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. (Helicopter Crash)
(हेही वाचा –Igatpuri मध्ये नागरिकांच्या घरात शिरले पाणी! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत)
हेलिकॉप्टर (Helicopter Crash) काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होतं. अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज आला. कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या आजूबाजुला न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community