युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन जारी! कसा कराल संपर्क?

182

रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धाला गुरुवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात सरकारला यश आलं आहे, तर जवळजवळ 15 हजार विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील नाशिक जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास त्यांनी अथवा त्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

येथे साधा संपर्क

देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली

टोल फ्री – 1800118797

फोन 011-23012113 / 23014104 / 23017905

फॅक्स 011-23088124

ईमेल [email protected] या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

( हेही वाचा: राज्यशासन ‘त्या’ झोपडपट्ट्यांची जबाबदारी घेणार नाही!  )

जिल्हाधिका-यांचे आवाहन

नाशिक जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक 0253- 2317151 या दूरध्वनी क्रमांकावर टोल फ्री. क्रमांक 1077 आणि [email protected] या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेवटी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.