भारत-पाक सीमेवर ‘हायअलर्ट’! काय आहे कारण?

93

प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून बीएसएफ जवानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच नियंत्रण रेषेवर (एलओसी) सज्जता वाढवण्यात आली आहे.

जम्मू सीमेवर सीमेवर सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू

जम्मू विभागाचे एडीजी मुकेश सिंग यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी संपूर्ण विभागासह बाहेरून येणाऱ्या वाहनांची आणि लोकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महामार्ग आणि सीमावर्ती गावांवर गस्त घालण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही सांगितले. तर महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात, असा अंदाज आहे. काश्मीर झोनच्या बीएसएफ अधिकार्यांनी सांगितले की, 2021मध्ये विविध ऑपरेशन्समध्ये तीन एके-47 रायफल, सहा 9-एमएम पिस्तूल, दारूगोळा, 20 ग्रेनेड, दोन आयईडी आणि 17.3 किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

(हेही वाचा राज्याच्या ‘या’ भागात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.