Bangladesh: बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या हल्ल्यांवर केंद्र सरकारकडून गंभीर दखल

160
Bangladesh: बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या हल्ल्यांवर केंद्र सरकारकडून गंभीर दखल
Bangladesh: बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या हल्ल्यांवर केंद्र सरकारकडून गंभीर दखल

बांगलादेशामध्ये (Bangladesh) काली मंदिरात झालेली मुकुट चोरी, दुर्गोत्सवादरम्यान पूजा मंडपावर झालेला हल्ला या प्रकरणांवर भारत सरकारतर्फे गंभीर दखल घेण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र विभागाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील हिंदू (BangladeshiHindus), सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांची सुरक्षा आणि सुरक्षितता यांची काळजी घ्यावी अशी विनंती भारत सरकारतर्फे करण्यात आली. (Bangladesh)

बांगलादेशातील (Bangladesh) मंदिरे आणि देवतांचे पद्धतशीर पावित्र्यभंग केले जात आहे अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘‘ढाक्याच्या तांतीबाजार येथील पूजा मंडपावरील हल्ला आणि सातखीरा येथील जोगेश्वरी काली मंदिरातील चोरी यांची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे,’’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा-Baba Siddiqui यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी – उपमुख्यमंत्री Ajit Pawar)

जुन्या ढाक्याच्या तांतीबाजार भागातील दुर्गापूजा मंडपात शुक्रवारी रात्री गावठी बॉम्ब फेकण्यात आल्याचे वृत्त बांगलादेशातील ‘प्रोथोम आलो’ या वर्तमानपत्राने दिले आहे. या बॉम्बचा स्फोट झाला पण त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या घटनांची भारताने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले आहे. (Bangladesh)

दुर्गापूजा सोहळ्यादरम्यान जवळपास ३५ अनुचित प्रसंग घडले असून त्या प्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे आणि १०पेक्षा अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती ढाक्याचे पोलीस महानिरीक्षक मोहम्मद मोइनुल इस्लाम यांनी ‘ढाका ट्रिब्युन’ या वर्तमानपत्राला दिली आहे. पूजा मंडपांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे चिंता आणि भीती आहे, अन्यथा हा सोहळा अधिक उत्साहात साजरा झाला असता असे तेथील हिंदू नागरिकांनी सांगितले. (Bangladesh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.