hezbollah commander killed : बेरूतमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला कमांडर ठार

बेरूतमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील मारला गेला आहे. लेबनीज दहशतवादी गटाच्या जवळच्या सूत्राने ही माहिती एएफपी या वृत्तसंस्थेला दिली आहे. सूत्रांनी अकीलची ओळख हिजबुल्लाहच्या रडवान फोर्सचा कमांडर म्हणून केली.

31
hezbollah commander killed : बेरूतमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला कमांडर ठार
hezbollah commander killed : बेरूतमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला कमांडर ठार

बेरूतमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील (Commander Ibrahim Aqeel Killed) मारला गेला आहे. लेबनीज दहशतवादी गटाच्या जवळच्या सूत्राने ही माहिती एएफपी या वृत्तसंस्थेला दिली आहे. सूत्रांनी अकीलची ओळख हिजबुल्लाहच्या रडवान फोर्सचा कमांडर म्हणून केली आहे.  (hezbollah commander killed)

तो फुआद शुक्र नंतर हिजबुल्लाह सशस्त्र दलाचा दुसरा सर्वात प्रमुख कमांडर होता. जुलैमध्ये आयडीएफच्या हल्ल्यात फुआद मारला गेला असल्याची सौदी अल-हदाथ चॅनेलने देखील हिजबुल्लाच्या जवळच्या स्त्रोताकडून पुष्टी करत ही माहिती दिली. 

जुलैमध्ये कमांडर बनवण्यात आले

इमाद मुघनीह हे हिजबुल्लाचे लष्करी कमांडर-इन-चीफ होते. 2008 मध्ये इस्रायलने त्याची हत्या केली होती. फुआद शुक्र यांनी त्यांची जागा घेतली होती. जुलै 2024 मध्ये त्याचीही हत्या झाली होती. त्यानंतर इब्राहिम अकीलने त्याची जागा घेतली आणि शुक्रवारी (20 सप्टेंबर) इस्रायलने त्यालाही मारले.

(हेही वाचा – Bandra Fort ने टाकली कात; सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच होणार लोकार्पण)

याआधी शुक्रवारी (20 सप्टेंबर) लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहने (Hezbollah) उत्तर इस्रायलवर 140 रॉकेट डागले. एक दिवसापूर्वी, दहशतवादी गटाचा नेता हसन नसराल्लाह याने पेजर बॉम्बस्फोटाचा इस्रायलकडून बदला घेण्याची शपथ घेतली होती. इस्रायली लष्कर आणि दहशतवादी गटाने ही माहिती दिली. (hezbollah commander killed)

फोन वापराबाबत लेबनॉनमध्ये चिंता

दक्षिणी बेरूत आणि लेबनॉनच्या इतर भागांमध्ये वॉकी-टॉकीचा स्फोट झाला, यामध्ये 20 लोक ठार झाले आणि 450 हून अधिक जखमी झाले. लेबनॉनच्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. हल्ल्यांच्या मालिकेमुळे लेबनॉनमधील लोक फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर आणि देशाच्या सुरक्षेबाबत चिंतित झाले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.