HMPV Virus ची भारतात एन्ट्री; तिसरा रुग्ण आढळला

255
HMPV Virus ची भारतात एन्ट्री; तिसरा रुग्ण आढळला
HMPV Virus ची भारतात एन्ट्री; तिसरा रुग्ण आढळला

चीनचा एचएमपीव्ही व्हायरस (HMPV Virus) अखेर भारतात पोहोचला आहे. तीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरसचे तीन रुग्ण समोर येणे ही मोठी बाब आहे, कारण चीनमध्ये तो वेगाने पसरत आहे आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचे दिसते. घाबरण्याची गरज नाही, असे निश्चितपणे सांगितले जात आहे, परंतु चीनमधून येणारी छायाचित्रे अस्वस्थ करणारी आहेत. (HMPV Virus)

हेही वाचा-Canada PM Justin Trudeau : जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार? कारण काय?

अहमदाबादमध्ये एका 2 महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, सोमवारीच (६ जाने.) कर्नाटकात (Karnataka) 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये हाच विषाणू आढळला आहे. कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, मुले नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, मुलांचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत नव्हे तर खासगी रुग्णालयात तपासण्यात आल्याचे कर्नाटक आरोग्य विभागाने स्पष्ट केले. (HMPV Virus)

हेही वाचा-Palghar Earthquake : पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गुजरातमधील (Gujarat) ऑरेंज हॉस्पिटलचे डॉ. नीरव पटेल यांनी सांगितले की, अहमदाबादमधील एका दोन महिन्यांच्या मुलाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाला सर्दी आणि खूप ताप होता. सुरुवातीला त्यांना पाच दिवस व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. यानंतर करण्यात आलेल्या अनेक चाचण्यांमध्ये मुलाला विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. (HMPV Virus)

मलेशियामध्येही सापडले रुग्ण
मलेशियामध्ये (Malaysia) एचएमपीव्ही व्हायरसचे काही रुग्ण समोर आल्यानंतर सरकारने तातडीने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. स्ट्रेट्स टाईम्समधील वृत्तानुसार, मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने लोकांना साबणाने वारंवार हात धुवा, मास्क घाला आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला दिला आहे. (HMPV Virus)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.