झाकीर नाईकच्या संघटनेवर केंद्राची ‘ही’ मोठी कारवाई

बेकायदेशी कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.

कायम आपल्या भाषणातून हिंदूद्वेष करणारा, तसेच विविध आमिष दाखवून हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणारा, भारताच्या विरोधात दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणारा मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक याच्या केंद्र सरकारने मुसक्या आवळल्या आहेत. त्याची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर दहशतवादाला खतपाणी घालण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या संस्थेवर याआधीच ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती, ती आणखी ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. याआधी या संस्थेवर १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती.

बेकायदेशी कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार बंदी

गृह मंत्रालयाने मलेशियातून काम करणाऱ्या आणि सध्या जगभरात नेटवर्क असलेल्या या संघटनेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार बंदी घातलेली ही पहिली संघटना आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देशाच्या सुरक्षेला बाधा पोहचेल अशा कृतींमध्ये सहभागी आहे. ही संघटना देशातील शांतता, धार्मिक सौहार्द बिघडवू शकते. तसेच देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा धक्का पोहचवू शकते. आयआरएफचा संस्थापक आणि प्रमुख झाकीर नाईक आणि या संघटनेचे सदस्य त्यांच्या अनुयायांना धर्माच्या आधारावर चिथावणी देत आहेत. तसेच द्वेष पसरवून शत्रुत्वाची भावना निर्माण करत आहेत. यातून देशाच्या एकतेला बाधा पोहचत आहे.

(हेही वाचा अर्जुन खोतकरांमुळे दंगली! नितेश राणेंची पोलिसांत तक्रार)

…तर नाईक विध्वंसक कृत्य घडवेल

झाकीर नाईकची भाषणे आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर आहेत. यातून तो भारतातील विशिष्ट भागात धार्मिक द्वेष वाढवून तरुणांना दहशतवादी कृत्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देतो. आता या संघटनेवर बंदी घातली नाही तर तो समर्थकांना एकत्र करून विध्वंसक कृत्य घडवून आणू शकतो. यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल. म्हणून यूएपीए अंतर्गत इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने नमूद केले. झाकीर नाईक मलेशियातून इंटरनेट सॅटेलाईट टीव्हीचा वापर करून जगभरातील आपल्या अनुयायांशी संवाद साधतो. याशिवाय सोशल मीडिया, मुद्रित साहित्य याचाही प्रचारासाठी वापर करतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here