धक्कादायक! वर्षभरात एक हजार जवान हनी ट्रॅपच्या जाळ्यात

125

काही दिवसांपूर्वीच एका जवानाला हनी ट्रॅप या प्रकाराने फसवून त्याच्याकडून भारतीय लष्काराशी संबंधीत माहिती पाकिस्तानातील महिला काढून घेत असल्याचे उघड झाले होते. आता या हनी ट्रॅपचा प्रकार लष्कारात वाढत असल्याचे समोर आले आहे. देशाच्या सुरक्षाविषयक गुपिते उघड करण्यासाठी आणि भारतीय लष्कराशी संबंधित माहिती या हनी ट्रॅपद्वारे मिळवून ती आयएसआयला पोहोचवली जात आहे. जवानांना अडकवण्यासाठी पैसे आणि फोन सेक्सचा वापर करण्यात येत आहे. वर्षभरात एक हजार जवान या हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत.

भारतविरोधी कटकारस्थान करण्यासाठी वापर 

देशात लष्करी गुप्तचर विभागामार्फत जानेवारी २०२१ ते आतापर्यंत सुमारे एक हजार अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. जवान जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून आलेली माहिती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटला पाठवली जाते. त्याचा वापर भारताविरोधात कटकारस्थान करण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

  • मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात.
  • सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हनी ट्रॅपचे स्वरूप बदलले आहे.
  • पूर्वी हनी ट्रॅप लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे.
  • आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅपअशा वेगवेगळ्या माध्यमांतून सहज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते.

 ( हेही वाचा :कोल्ह्यांमुळे चिपी विमानतळ पडतेय बंद! काय आहे भानगड? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.