चीनच्या विरोधात युद्ध होऊ द्याच, आम्हीच जिंकू! लष्करप्रमुखांचा विश्वास 

आजच्या तारखेला जरी चीनसोबत युद्ध झाले तरी आम्हीच जिंकू, असा विश्वास लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांनी व्यक्त केला. भारत-चीन सीमावादाच्या प्रश्नावर लष्करप्रमुख नरवणे यांनी लक्ष वेधले. भारत आणि चीन यांच्यादरम्यान, बुधवारी चौदावी सैन्यस्तरावरील चर्चा पार पडली. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे हे स्वतः देखील या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुनही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. सीमाभागातील घुसखोरी, पाकिस्तान या मुद्द्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहे.

प्रश्न चर्चेतून सोडवता येईल 

चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मकता दाखवली आहे. पण चर्चेतून प्रश्न सुटला नाही आणि युद्ध करण्यासारखी परिस्थिती उद्भवली, तर आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. उत्तर सीमेवरील परिस्थितीबाबत लष्कर प्रमुखांना प्रश्न विचारण्यात आला होता. चर्चा हा प्रश्न सोडवण्यासाठी, वाद मिटवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहेच. पण त्याने वाद मिटला नाही, तर युद्धातून भारताचाच विजय होईल, असाही विश्वास लष्करप्रमुख नरवणे यांनी व्यक्त केला.सीमा भागाजवळ घुसखोरीचे प्रकार वाढत आहे. पश्चिम सीमाभागातील नियंत्रणे रेषजवळ परिस्थिती सुधारणा होत असली, तरी तिथे दहशतवादी कारवाया वाढल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा ‘या’ कामांच्या जोरावर आदित्य ठाकरे मारणार निवडणुकीत बाजी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here