चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हवाई हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कराने नवीन तयारी सुरू केली आहे. लष्कराने ६,८०० कोटी रुपयांची २ शस्त्रे खरेदी केली आहेत. लष्कर सीमांवर ५०० पेक्षा जास्त प्रक्षेपकांसह दोन्ही सीमांवर ३००० हून अधिक क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. (Igla-VSHORADS)
ही दोन्ही प्रकारची क्षेपणास्रे वेगवेगळी आहेत. पहिले क्षेपणास्र खांद्यावरून चालवता येणारे आहे. ते Igla मिसाइल असे त्याचे नाव आहे, तर दुसरे क्षेपणास्र हे स्वदेशी VSHORADS असे याचे नाव आहे. दोन्ही शस्त्रे प्रणाली अल्प पल्ल्यासाठी वापरण्यायोग्य आहेत. ही क्षेपणास्त्रे शत्रूचे ड्रोन, हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे यावर हल्ला करण्यासाठी वापरली जाणार आहेत.
(हेही वाचा – NIA: टेरर फंडिंगप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे, अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात)
इग्ला क्षेपणास्राचे वैशिष्ट्य…
Igla या शस्राचे जुने व्हर्जन १९८९मध्ये भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आले होते. आता या शस्त्राचे नवे व्हर्जन लष्काराने तयार केले आहे. नवे इग्ला मिसाईल (इग्ल क्षेपणास्र) लेझर-मार्गदर्शित असेल. या क्षेपणास्त्र प्रणालीची २०० प्रक्षेपके आणि १२०० क्षेपणास्त्रे लष्कर आणि हवाई दलाने तयार केली आहेत. Igla-S क्षेपणास्त्राचे वजन १०.८ किलो आहे. संपूर्ण प्रणालीचे वजन १८ किलो आहे. या यंत्राची लांबी ५.१६ फूट आहे. व्यास ७२ मिलिमीटर आहे. या क्षेपणास्त्राचे वजन १.१७ किलो आहे. इग्ला-एसची श्रेणी ५ ते ६ किमी आहे. ते जास्तीत जास्त ११,००० फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते. नवीन इग्ला-एस विमानविरोधी क्षेपणास्त्र भारतीय सैन्यात समाविष्ट केलेल्या जुन्या इग्ला क्षेपणास्त्राची जागा घेईल.
एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली
व्ही. एस. ओ. आर. ए. डी. VShorAD (व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स) प्रणाली चीन-पाकिस्तान सीमेवर तैनात केली जाईल. अनेक यशस्वी प्रयोग केले गेले आहेत. VShorAD हवाई संरक्षण (एअर डिफेंस) एस-४०० ही रशियाची सर्वात प्रगत लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे. ते जमिनीवर ठेवलेल्या मनुष्य-पोर्टेबल प्रक्षेपकातून प्रक्षेपित केले जात होते. विमाने, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन यावर हल्ला करण्यासाठी या शस्राचा वापर केला जातो. VSHORADS चे वजन २०.५ किलो आहे. याची लांबी ६.७ इंच आणि रुंदी ३.५ इंच आहे.
हैदराबाद आणि पुणे स्थित ही कंपनी लष्कर आणि हवाई दलासाठी या क्षेपणास्त्र प्रणालीची २०० प्रक्षेपके आणि १२०० क्षेपणास्त्रे तयार करणार आहे. उर्वरित प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्रे पुढील टप्प्यात उपलब्ध असतील. हे क्षेपणास्त्र २२६६ किमी/ताशी वेगाने लक्ष्याच्या दिशेने जाते. म्हणजेच शत्रूला पळून जाण्याची शक्यता कमी असते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community