भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाला बुधवारी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या पथकाने वेळेच सतर्कता दाखवत बचावकार्य केले त्यामुळे काही वेळात लागलेली आग अटोक्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नसून युद्धनौकाही सुरक्षित आहे. या प्रकणाचं गांभीर्य लक्षात घेता नौदलाकडून बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे.
(हेही वाचा – खुशखबर! ‘या’ रेल्वे स्थानकावर लवकरच सुरू होणार Coach Restaurant)
असेही सांगितले जात आहे की, आग लागल्यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रणेचा वापर करून आग विझवली. भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य जगातील १० सर्वात मोठ्या विमानवाहू युद्ध नौकांमध्ये समाविष्ट आहे. ही एक कीव श्रेणीतील मॉडिफाईड विमानवाहू युद्धनौका असून ती २०१३ मध्ये भारतीय नौदलात सामील झाली होती.
युद्धनौका कर्नाटकातील कारवार येथून सागरी कारवाईसाठी निघाली होती. यादरम्यान बुधवारी त्यामध्ये आग लागली. या प्रकरणी यासाठी चौकशी मंडळ स्थापन करण्यात आलं आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचं कारण समजू शकेल, असे ट्विट नौदलाच्या प्रवक्त्याने केले आहे.