IND Vs China Dispute: LAC वर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भारताचा भर

162

चीनला थोपवण्यासाठी भारताने सीमाभागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनमध्ये काही दिवसांपूर्वी संघर्ष झाला. त्यामुळे सध्या चीन आणि भारत यांच्यात सीमेवर तणाव पाहायला मिळत आहेत. एकीकडून चीन सीमावर्ती भागात हालचाली कायम आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करत आहे. सीमावर्ती भागात भारत सरकारकडून रस्ते आणि भूयारांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

‘या’ भागांत भारताच्या पायाभूत सुविधा उभारणीला वेग 

भारत सरकारने सीमेवर पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती दिली आहे. भारत सीमावर्ती भागात रस्ते बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे. अरुणाचल प्रदेशात 5 हजार 700 फूट उंचीवर नेचिफू बोगद्याचे बांधकाम सुरु आहे. सेला पास बोगदा तवांगजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे बांधला जात आहे. बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमावर्ती भागात नवीन रस्ते बांधण्यात गुंतलेली आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेशातील सर्व सीमावर्ती गावे पक्क्या रस्त्याने एकमेकांशी जोडण्याची योजना सरकारने आखली आहे.

( हेही वाचा: नौदलात दाखल होणार INS Murmugaon; जाणून घ्या या शक्तीशाली युद्धनौकेची वैशिष्ट्ये )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.