India Advisory on Syria : ‘ताबडतोब देश सोडा’; सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?

195
India Advisory on Syria : 'ताबडतोब देश सोडा'; सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?
India Advisory on Syria : 'ताबडतोब देश सोडा'; सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?

सीरियात (Syria) वाढत असलेले बंडखोरांचे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायजरी) (Ministry of External Affairs) जारी केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (India Advisory on Syria)

हेही वाचा- Megablock News : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक, वेळापत्रक नक्की पाहा…

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी सोशल मीडियावर एका पोस्ट केली आहे. त्यात लिहिले की, सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाला जाणे टाळावे. तसेच सध्या सीरियामध्ये उपस्थित असलेल्या भारतीयांना +963 993385973 (WhatsApp वर देखील) वर भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच आपण अद्यतनांसाठी hoc.damascus@mea.gov.in या ईमेलद्वारे संपर्क करू शकता. (India Advisory on Syria)

परराष्ट्र मंत्रालयाने असाही सल्ला दिला आहे की, जे लोक परत येऊ शकतात, त्यांनी लवकरात लवकर व्यावसायिक उड्डाणे करून मायदेशी परत यावे आणि इतरांना त्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे आणि आपल्या प्रवासावर मर्यादा ठेवाव्यात. (India Advisory on Syria)

हेही वाचा-Solapur District Bank Loan Scam : महायुती सरकारची पहिली मोठी कारवाई; शरद पवार गटाच्या नेत्यांना कर्जवसुलीसाठी नोटीसा धाडल्या 

सीरियामध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. गेल्या एका आठवड्यात हयात तहरीर अल-शाम नावाच्या बंडखोर संघटनेने सीरियात आघाडी उघडली आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांना सत्तेवरून हटवून त्यांना आपले नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे. या मालिकेत तो सीरियातील शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. बंडखोरांनी 30 नोव्हेंबर 2024 रोजी सीरियातील दुसरे सर्वांत मोठे शहर अलेप्पो ताब्यात घेतले होते. यानंतर ते दक्षिणेकडील हमा प्रांताकडे गेले. बंडखोरांनी उत्तर आणि मध्य हमामधील 4 शहरेही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हे बंडखोर आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांची हत्या करत आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या हल्ल्यातच, बंडखोरांनी एक मोठा नरसंहार केला आणि एकाच हल्ल्यात 300 लोक मारले गेले. (India Advisory on Syria)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.