भारत-बांगलादेश सीमेवर तस्करांचा ‘पहारा’?

भारत-बांगलादेश सीमेवरुन हर एक वस्तूची तस्करी होऊ लागली आहे. सीमारेषेची योग्यप्रकारे न झालेली आखणी, तसेच तारेच्या मजबूत कुंपणांसह सीमा सील न केलेली असणे या प्रमुख कारणांमुळे बांगलादेशातील गुराखीदेखील भारतीय सीमेत गायी-म्हैशी चरायला घेऊन येतो, अशी या सीमेची परिस्थिती आहे.

भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर दिवस-रात्र विविध गोष्टींची तस्करी सुरु असते. ही सीमा म्हणजे बेकायदा व्यवसायाचा स्रोत बनली आहे. याठिकाणी दररोज कोणती ना कोणती तस्करी पकडली जाते. बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे जवान या कारवाया करत असतात. मात्र या ठिकाणी आवर्जून नमूद करायची गोष्ट म्हणजे दररोज कारवाया होत असूनही तस्करीची प्रकरणे कमी झालेली नाहीत. ती दररोज घडतच आहेत, यावरून तस्करीचे प्रमाण लक्षात येते. शिवाय दिवसातून एकच घटना समोर येत आहे, याव्यतिरिक्त अशा अनेक तस्करीच्या घटना घडतात. ज्या पकडल्या जात नाहीत. त्यामुळे या सीमेवर बीएसएफ जवानांना ऐवजी तस्करांचा पहारा असतो का? असा प्रश्न पडला आहे.

सीमा भागात दोन्ही देशांच्या नागरिकांचा सहज वावर!

बांगलादेश सीमेवरुन भारतात हर एक वस्तूची तस्करी होऊ लागली आहे. सीमारेषेची योग्यप्रकारे न झालेली आखणी, तसेच तारेच्या मजबूत कुंपणांसह सीमा सील न केलेली असणे या प्रमुख कारणामुळे बांगलादेशातील गुराखीदेखील भारतीय सीमेत गायी-म्हैशी चरायला घेऊन येतो, अशी या सीमेवरील परिस्थिती आहे. इतक्या सहजपणे या सीमा भागात लोकांची ये-जा होत असते. यामुळे या ठिकाणी तस्करीला जोर येत असतो, हे वास्तव आहे. या सीमेवरून केवळ मानवी तस्करी आणि अमली पदार्थांचीच तस्करी होत नाही तर छोट्या-मोठ्या सर्व वस्तूंची तस्करी होत असते, त्यात अगदी इलेक्ट्रॉनिक मीटरपासून ते ऑक्सिमीटरपर्यंच्या वस्तूंचा समावेश झाला आहे.

बांगलादेशी सीमेवरून घुसखोरी, तस्करी होते, यात नवल नाही. या ठिकाणी सीमावर्ती भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा तस्करीचा बनला आहे. पश्चिम बंगाल येथील बांगलादेश सीमा लगतचे लोक अक्षरशः मोकाट सुटल्यासारखे वावरतात. तिथे बांगलादेशाची साडेचार हजार किमी इतकी सीमा लागते. त्या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाचे जवान काम करतात. तिथे जर दररोज तस्करीचे प्रकार उघडकीस येत आहेत, याचा अर्थ बीएसएफचे जवान नीट काम करत नाहीत, हे स्पष्ट आहे. ही तस्करी थांबवायची असेल, तर लगेच थांबवता येईल. कारण ती कशी थांबवायची हे सर्वांना माहित आहे. त्यासाठी इंटेलिजन्स ऑपरेशन हाती घेतली पाहिजेत. पण त्याकरता इच्छाशक्ती लागते. त्यातुलनेत आसामकडील सीमाभागात ९० टक्के तस्करी कमी झाली आहे.
– ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन.

(हेही वाचा : सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचे धोरण हवे! निवृत्त मेजर जनरल गडकरी यांचे मत)

मागील महिनाभरात बीएसएफने केलेल्या कारवाया!

 • ३ जून – ३६ किलो मानवी केसांचा साठा जप्त.

 • २ जून – सीमेवर मार्लबोरो कंपनीची ३.५ लाख रुपयांची सिगरेट जप्त केली.
 • ३१ मे – २४ परगणा येथे २० पॉली बॅग फिश सीड आणि ४५ बॉटल्स फेंसिडिल (प्रतिबंधित कफ सिरप अर्थात एक प्रकारचा अमली पदार्थ) जप्त करण्यात आले.
 • ३० मे – नादिया जिल्ह्यातील बांगलादेशातील सीमेकडे दुर्मिळ जातीच्या पक्षांची तस्करी पकडण्यात आली.

 • २८ मे  –  २४ परगणा येथून ८१ याब टॅब्लेट्स (नशेची औषधे) जप्त केली.
 • २४ मे  – चुरिहंतपूर येथील २ लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या ४०० भारतीय चलनाच्या बनावट नोटा जप्त केल्या.
 • २२ मे – एका व्यक्तीला पत्नी आणि मेहुणीला विकताना पकडले.
 • २० मे – ३ किलो चांदीच्या दागिन्यांची तस्करी करताना एका युवकाला अटक.
 • १२ मे  – मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून ८ किलो हेरॉइनचा साठा जप्त.

 • ११ मे – वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबकांचा साठा जप्त.

 • ६ मे –   नादिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात २९८ प्लस ऑक्सिमीटरची तस्करी करताना एका युवका पकडले.

 • ४ मे – हकीमपुर जिल्ह्यात १२० टाळे तस्करी करताना पकडले.

(हेही वाचा : नौदलाकडे ६ अत्याधुनिक पाणबुड्या येणार! किती कोटींचा आहे प्रकल्प? वाचा…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here