भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय; चीनने अखेर लडाखमधील सैन्य घेतले मागे

भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमध्ये गेल्या काही काळापासून तणाव होता. आता हा तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्याची या भागातून पिछेहाट होण्यास सुरुवात झाली आहे. चीनने म्हटल्याप्रमाणे, सैन्यदलांचे मागे हटणे, हे भारत- चीन सीमेवर शांतीसाठी चांगले आहे. दोन्ही देशांनी उचललेल्या या पावलांमुळे या परिसरात असलेला तणावही निवळण्याची शक्यता आहे.

भारत आणि चीनमध्ये कमांडर लेव्हलवर झालेल्या 16 व्या चर्चेत हा तोडगा निघाला असण्याची शक्यता आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने ही पीछेहाट या चर्चेशी जोडली आहे. ही चर्चा दोन्ही देशांमध्ये जुलैत चुशुल- माल्डो मिटिंग पाॅंइटवर झाली होती.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, चीन- भारत कोअर कमांडर बैठकीच्या 16 व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार, जियानान -डाबन क्षेत्रातील चिनी आणि भारतीय सैन्य नियोजितरित्या मागे सरकत आहे. यामुळे सीमेवर शांतीसाठी अनुकूल स्थिती आहे. चीनच्या पत्रकात ज्याचा उल्लेख जियानान-डाबन असा करण्यात आला आहे, त्याला भारतीय सैन्यदलाने जारी केलेल्या पत्रकात गोगरा- हाॅटस्प्रिंग असे संबोधण्यात आले आहे.

( हेही वाचा:  ‘त्यांना माझ्यामुळे पुण्य मिळतंय’, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे आणि विरोधकांना टोला )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here