अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ नुकतीच ही हाणामारी झाली. भारतीय जवानांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.
या चकमकीत भारताचे 30 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. त्याचबरोबर चीनचे अनेक सैनिकही जखमी झाले आहेत. भारताचा एकही सैनिक गंभीर नसला तरी या चकमकीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या कमांडर्सनी चीनच्या कमांडरसोबत फ्लॅग मीटिंग केली आहे.
(हेही वाचा Iran hijab row : आंदोलनकर्त्या महिलांना लष्कराने अशा जागी लक्ष्य केले, वाचून धक्का बसेल
Join Our WhatsApp Community