लष्करात सर्वात जास्त मनुष्यबळ असणारा देश हा चीन असून त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. पण आता एका अहवालानुसार, भारतीय संरक्षण मंत्रालय नोक-या देण्याच्या बाबतीत नंबर वन असून भारताने याबाबतीत चीनला देखील मागे टाकल्याचे समोर आले आहे. सर्वात जास्त नोक-या देण्यात भारत जगात अव्वल स्थानी आहे. स्टॅटिस्टाच्या एका अहवालानुसार ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
काय सांगतो अहवाल?
स्टॅटिस्टा या जर्मनस्थित खासगी संस्थेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, जगातील सर्वात मोठ्या नोकरदारांच्या क्रमवारीत भारताचे संरक्षण मंत्रालय आघाडीवर आहे. भारतीय लष्करात सक्रीय सेवा कर्मचाकरी, नौदल आणि नागरी कर्मचा-यांसह एकूण कर्मचा-यांची संख्या ही 29.2 लाख इतकी आहे. तर भारताच्या खालोखाल अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा क्रमांक लागतो. अमेरिकेन संरक्षण मंत्रालयाने 29.1 लाख लोकांना नोक-या दिल्या आहेत. चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मी ही 25 लाख लोकांना लष्करात नोक-या देत असल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.
(हेही वाचाः ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज)
जगभरातील लष्करी खर्च वाढला
जगभरातील लष्करी खर्च हा आता 2 हजार 113 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे. स्टॉकहोम इंचरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट(SIPRI)ने प्रसिद्ध केलेल्या डेटानुसार, 2021 मध्ये लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या पाच देशांमध्ये अमेरिका,चीन,भारत,ब्रिटन आणि रशिया या देशांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community