भारताचा शेजारील देश चीनचा असंवेदनशील चेहरा समोर आला आहे. फसव्या चीनला हौतात्म्यांचा आदर करण्याच्या नैतिकतेचा विसर पडला आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून भारताच्या लष्कराच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनने जनरल रावत यांच्या मृत्यूला भारतीय लष्कराच्या उणिवांचे फलित म्हटले आहे. ग्लोबल टाइम्सने आपल्या लेखात काय लिहिले आहे, ते जाणून घ्या.
ग्लोबल टाइम्सने काय लिहिले?
भारताच्या संरक्षण प्रमुखाचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यामुळे भारतीय लष्करातील शिस्त आणि युद्धाच्या तयारीचा अभावच उघड झाला नाही. तर, देशाच्या लष्करी आधुनिकीकरणालाही मोठा धक्का बसला आहे. चीनविरोधी भारतीय संरक्षण अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतरही दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात भारताच्या आक्रमक भूमिकेत बदल होण्याची शक्यता नाही, असे ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे.
( हेही वाचा: भाजपाच्या निलंबित आमदारांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी )
बिपीन रावत यांना चीनविरोधी म्हटले
ग्लोबल टाइम्सने जे विष ओतले आहे त्यानुसार जनरल बिपीन रावत यांचे वर्णन चीनविरोधी म्हणून करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचा जगातील सर्वोच्च सैन्यात समावेश असताना, चीन भारतीय सैन्याला शिस्तहीन लष्करी संस्कृतीचे असल्याचे सांगत आहे. भारतीय लष्कराने एसओपीचे पालन केले नाही, असे चीनने म्हटले आहे. जिनपिंग सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सचे संपादक हु झिजिन जी यांना हे माहीत नाही की हुतात्मा झालेले सैनिक जरी शत्रू देशाचे असले तरी त्यांच्या हौतात्म्यापुढे त्यांच्या बंदुकाही नतमस्तक होतात.
Join Our WhatsApp Community