कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलाचे चीनसमोर नवे आव्हान

भारताविरुद्ध कारवाया करण्याची चीनची खुमखुमी काही जात नाही. भारताशी संलग्न असलेल्या सीमेदरम्यान चीन आपली सैन्यबल वाढवत आहे. चीन सात एयर बेस तयार करत असल्याची माहितीही मिळत आहे. चीनच्या या कारस्थानांवर भारताची करडी नजर आहे. त्यामुळेच चीनच्या मनसुब्यांना उत्तर देण्यासाठी भारतानेही आपली राफेल विमाने सीमेवर तैनात केली आहेत. 300 किमी. अंतरावरुन अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. त्यामुळे चीनला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतानेही तयारी केली आहे.

18 विमाने होणार तैनात

भारत-चीन आणि भूतान सीमेवर हाशिमारा एअर फोर्स बेसवर राफेल विमानांची स्क्वॉड्रन तैनात करण्यात येणार आहे. एकूण 18 विमानांच्या या स्क्वॉड्रनपैकी आतापर्यंत 6 विमाने तैनात करण्यात आली आहेत. या विमानांमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि मिसाईल आहेत. त्यातील स्काल्प मिसाईलची क्षमता 300 किमी. अंतरावर अचूक लक्ष्यभेद करण्याची आहे. तर मटेयोर मिसाईलची क्षमता 100 किमी. अंतरावर लक्ष्यभेद करू शकते. या विमानांमध्ये असलेला हॅमर स्मार्ट बॉम्बमध्ये जीपीएस लोकेशन वरुन थेट हल्ला करण्याची ताकद आहे. त्यामुळे चिन्यांच्या लष्करी तळांवर पाळत ठेऊन उद्ध्वस्त करण्याची ताकद या बॉम्बमध्ये आहे.

(हेही वाचाः कारगिल विजय दिवसः भारतीय सेनेने आवळल्या भ्याड पाकड्यांच्या नाड्या)

हाशिमरा एयरबेसचे महत्त्व

पश्चिम बंगालमधील हाशिमरा एयबेस 2011 पासून सक्रिय नव्हते. पण गेल्या काही वर्षांपासून चीनच्या हालचालींवर लक्षल ठेवण्यासाठी हा एयरबेस पुन्हा सक्रिय करण्यात आला.

राफेलची शक्तीशाली आयुधे

स्काल्प मिसाईल

300 किमी. अंतरावरुन जमिनीवरील लक्ष्यभेद करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. हवेतून मारा करू शकणारे लांब पल्ल्याचे क्रूज मिसाईल आहे. या मिसाईलचे वैशिष्ट्ये असे की जेव्हा ते डागले जाते, तेव्हा आवाजाच्या कितीतरी पट जास्त हल्ला केला जातो. 4 हजार किमी.च्या उंचीवरुन 450 किलो वजनाच्या विस्फोटकांचा मारा करुन शत्रूला नेस्तनाभूत करण्याची ताकद या मिसाईलमध्ये आहे.

मोटेयोर मिसाईल

100 किमी. पर्यंत दृष्टिआड असणा-या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. यात जेट, अनमॅन्ड एरियल वेहिकल आणि क्रूज मिसाईलचा समावेश आहे.

हॅमर बॉम्ब

हवेतून जमिनीवर मारा करणारा बॉम्ब. अत्याधुनिक जीपीएस आणि लेझर तंत्रज्ञानाचा वापर करुन हा बॉम्ब आपले सावज टिपतो. 20 ते 70 किमी. अंतरापर्यंत मारा करण्याची या बॉम्बची रेंज आहे. याद्वारे बंकर, छावण्या आणि इमारतींना टार्गेट करणे शक्य आहे.

(हेही वाचाः कारगिल विजय दिनी पंतप्रधानांसह मंत्र्यांनी केले वीरांना अभिवादन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here