संरक्षण क्षेत्रातील आत्म निर्भर भारत अंतर्गत भारताने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. भारतीय नौदलाने पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDO ने नौदलासाठीच विकसित केली आहे. भारतीय नौदलाने बुधवारी ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडो (SMART) क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली.
पाणबुडीविरोधी युद्धात ही क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. ही एक कॅनिस्टर आधारित क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी लांब पल्ल्याच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. SMART क्षेपणास्त्र युद्धनौकांवरून तसेच किनारी भागातून सोडले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र कमी उंचीवर हवेत आपले बहुतेक उड्डाण पूर्ण करते आणि लक्ष्याजवळ पोहोचल्यानंतर टॉर्पेडो क्षेपणास्त्रातून सोडले जाईल आणि पाण्याखालील लक्ष्यावर धडकेल. (DRDO)
(हेही वाचा Congress : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात, मतदान काँग्रेस किंवा डाव्यांना करू नका तर भाजपाला करा)
टॉर्पेडो हे सिगारच्या आकाराचे शस्त्र आहे, जे पाणबुडी, युद्धनौका किंवा लढाऊ विमानातून डागता येते. हा टॉर्पेडो आपल्या लक्ष्याच्या संपर्कात येताच मोठा आवाज करत त्याचा स्फोट होतो. ही क्षेपणास्त्र प्रणाली नौदलात सामील झाल्यानंतर नौदलाच्या सागरी क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. पाणबुडीविरोधी युद्धात ही क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (DRDO)
Join Our WhatsApp Community