भारतीय नौदलाच्या शूरवीरांनी उरणच्या खोल समुद्रात तिरंगा फडकवला आहे. नौदलाच्या कमांडोजनी उरण जवळच्या समुद्रात डीप डाईव्ह करून पाण्याखाली तिरंगा फडकवून आगळी वेगळी मानवंदना दिल्याचे दिसले. तर आफ्रिका, युरोप या देशांच्या खोल समुद्रात तैनात असलेल्या नौदलाच्या कमांडोजनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)
यंदा देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन हा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यासाठी देशात अनोख्या संकल्पना आखत नागरिकांमध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उरण शहरात देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलात पाण्याखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी माजी मरीन कमांडोंच्या संकल्पनेतून सोहळा साजरा करताना स्विमिग पुलमधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन साजरा करण्यात आला. यावेळी नौदलातील निवृत्त दहा माजी मरीन कमांडो यांनी सहभाग घेतला होता.