भारताकडे शक्तीशाली लढाऊ विमान राफेलमुळे (Rafale) भारताच्या हवाई दलाची ताकद वाढलेली आहे. मात्र पाकिस्तानने याच राफेल सोबत युद्ध सराव केल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. भारत सतर्क झाला आहे. ज्या देशाकडून भारताने राफेल (Rafale) विमाने खरेदी केली आहेत, त्याच फ्रान्सच्या देशासोबत राफेल विमानांच्या साहाय्याने युद्ध सराव केला आहे.
(हेही वाचा Fire News : मस्जिद बंदरमधील १२ मजली इमारतीला भीषण आग; २ महिलांचा मृत्यू, ३ जखमी)
भारतीय हवाई दल हलक्या श्रेणीतील लढाऊ विमान तेजस एमके१ ए च्या नव्या पिढीची वाट पाहत आहे. अमेरिकेने या विमानाची इंजिने अद्याप पुरविलेली नाहीत. अशातच हिंदुस्तान एअरोनॉटिक्सकडून देखील या विमानांच्या बांधणीला विलंब होत आहे. यावर हवाई दल प्रमुखांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान चीनच्या पाचव्या पिढीचे स्टिल्थ फायटर विमाने खरेदी करणार असल्याचे वृत्त आले होते. चीन आणि पाकिस्तानने मिळून जेफ-१७ ब्लॉक ३ हे लढाऊ विमान बनविले आहे. या लढाऊ विमानाला घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासात भाग घेतला होता. या युद्धाभ्यासात राफेल (Rafale), एफ १५ ईगल आणि युरोफायटर टायपून ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. पाकिस्तानला राफेलसोबत (Rafale) युद्धसराव करण्यास मिळाल्याने राफेलच्या शक्ती आणि त्याच्या कमतरता यासोबतच राफेलविरोधात कसे लढावे, याची माहिती मिळाली आहे. जे भारतासाठी घातक ठरू शकते.
Join Our WhatsApp Community