भारतीय नौदलाने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. यात भारताला मोठे यश मिळाले आहे, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पश्चिम किनारपट्टीवर तैनात नौदलाच्या लढाऊ फ्रिगेट आयएनएस विशाखापट्टणमवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची ब्रह्मोस ही समुद्रातून समुद्रात मारा करणारी आवृत्ती असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. चाचणी दरम्यान, ब्रह्मोस’ने अचूकत लक्ष्य भेदत जहाजावर आदळले.
डीआरडीओने बनवले क्षेपणास्त्र
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र डीआरडीओ (DRDO) ने विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला नुकताच २९८ किमीवरून ४५० किमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते. रशियाच्या P-800 Onkis क्रूझ क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानावर हे क्षेपणास्त्र आधारित आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
( हेही वाचा : माथेरानकरांना कोरोना निर्बंध नको! काय आहे कारण? )
विशेष काय आहे?
- ब्रह्मोस क्षेपणास्त्र स्वदेशी विकसित करण्यात आले आहे.
- ब्रह्मोस क्षेपणास्त्र हा रशिया आणि भारताचा संयुक्त प्रकल्प आहे.
- यामध्ये ब्रह म्हणजे ‘ब्रह्मपुत्रा’ आणि मोस म्हणजे ‘मोस्कवा’.
- ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे ज्याची २१व्या शतकातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांमध्ये गणना केली जाते.
- ब्रह्मोस हे रॅमजेट इंजिनद्वारे समर्थित आहे, हे इंजिन क्षेपणास्त्राचा वेग वाढवते.
- हे क्षेपणास्त्र भविष्यात मिग-२९, तेजस आणि राफेलमध्येही तैनात केले जाणार आहे.
Advanced sea to sea variant of BrahMos Supersonic Cruise missile was tested from INS Visakhapatnam today. Missile hit the designated target ship precisely. @indiannavy @BrahMosMissile#SashaktBharat#AtmaNirbharBharat pic.twitter.com/BbnazlRoM4
— DRDO (@DRDO_India) January 11, 2022
‘प्रलय’ ची यशस्वी चाचणी झाली
विशेष म्हणजे, यापूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) कमी पल्ल्याच्या प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. DRDO ने 22 आणि 23 डिसेंबर रोजी प्रलय चाचणी यशस्वीपणे घेतली. त्याची पहिली यशस्वी चाचणी २२ डिसेंबर रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community