भारताने, सोमवारी अणवस्त्र हल्ल्यासाठी सक्षम असलेल्या अग्नी-4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशा येथील एपीजे अब्दुल कलाम बेटावर स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्त्वाखील ही यशस्वी चाचणी घेतल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
( हेही वाचा : छोट्या पक्षांनी कोंडी केल्याने शिवसेनेची दमछाक; पवार, महाडिकांचे भवितव्य अपक्षांच्या हाती )
चाचणी यशस्वी
अग्नी-4 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 4 हजार किलोमीटर आहे. प्रक्षेपणाने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच संरक्षण प्रणालीची विश्वासार्हता सत्यापित केली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंध क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करते. अलीकडेच भारतीय नौदलाने ‘सीकिंग हेलिकॉप्टर’मधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (आयटीआर) येथे ही चाचणी घेण्यात आली. त्याचवेळी भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे ‘सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या जहाजविरोधी आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती.