खलिस्तानी दहशतवादी Arsh Dalla च्या प्रत्यार्पणाची मागणी करणार भारत!

33
खलिस्तानी दहशतवादी Arsh Dalla च्या प्रत्यार्पणाची मागणी करणार भारत!
खलिस्तानी दहशतवादी Arsh Dalla च्या प्रत्यार्पणाची मागणी करणार भारत!

भारत सरकारने (Government of India) खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorists) अर्शदीप सिंग गिल उर्फ ​​अर्श डल्लाला (Arsh Dalla) कॅनडातून (Canada) परत आणण्याची तयारी सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक निवेदन जारी केले की, भारतीय एजन्सी कॅनडाकडून डल्लाच्या प्रत्यार्पणाची मागणी करतील. आम्हाला आशा आहे की, कॅनडा त्याला भारताकडे सुपूर्द करेल. (Arsh Dalla)

डल्लावर भारतात अनेक गुन्हे दाखल
अर्श डल्ला (Arsh Dalla) सध्या कॅनडा पोलिसांच्या ताब्यात आहे. अर्श डल्लाला 28 ऑक्टोबर रोजी कॅनडातील मिल्टन येथे शूटआउट दरम्यान अटक करण्यात आली होती. डल्लावर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो कॅनडामध्येही अशाच प्रकारच्या कृत्यात सहभागी आहे. भारताने 2023 मध्ये कॅनडाने डल्लाला अटक करण्याची मागणी केली होती. मात्र कॅनडाच्या सरकारने त्यावेळी ही मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान, जानेवारी 2023 मध्ये भारताने कॅनडाला डल्लाचा (Arsh Dalla) संशयास्पद पत्ता, त्याचे भारतातील व्यवहार, त्याची मालमत्ता आणि मोबाइल नंबरची माहिती दिली होती.

कोण आहे अर्श डल्ला ?
अर्श (Arsh Dalla) हा खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात 50 हून अधिक खटले प्रलंबित आहेत. यामध्ये खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दहशतवादी कारवाया आणि टेरर फंडिंग यांचा समावेश आहे. मे 2022 मध्ये भारत सरकारने अर्श डल्ला विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर 2023 मध्ये त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले. अटक टाळण्यासाठी अर्शने पंजाबमधून कॅनडाला पळ काढला आणि तेथून तो आपल्या कारवाया करू लागला. भारतीय एजन्सी अनेक दिवसांपासून डल्लाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.