पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमेवर पहिली Tejas aircraft स्क्वाड्रन बिकानेरच्या हवाई तळावर तैनात होणार आहे. या दलाचे पहिले विमान याच महिन्यात तैनात होणार आहे. वर्षाखेरीस या तळावरील सर्व १८ विमाने ताफ्यात येतील. त्यात दोन प्रशिक्षणाची विमाने आहेत.
(हेही वाचा Aditya Thackeray : अनंत अंबानींच्या प्री वेडिंग कार्यक्रमात आदित्य ठाकरे त्यांच्या ड्रेसवरून होत आहेत ट्रोल…)
आगामी पाच वर्षांत पश्चिमेकडील आघाडीवर तेजसचे (Tejas aircraft) आणखी दोन स्क्वाड्रन तैनात होतील. निवृत्त होणाऱ्या मिग २१ व मिग २७ ची जागा तेजस घेईल. तेजसमुळे देशाची पश्चिमेकडील सीमेचे हवाई क्षेत्र सुरक्षेच्या दृष्टाने अधिक बळकट होईल. राजस्थानच्या नाल येथे तेजसची (Tejas aircraft) पहिली स्क्वाड्रन आल्यानंतर पश्चिम आघाडीवर तीन ते चार वर्षांनंतर आणखी हवाई दल तैनात केले जाणार आहेत. नालनंतर गुजरातच्या कच्छ भागात हवाई तळावर तेजसची दुसरे स्क्वाड्रन तैनातीची योजना आहे. हवाई दलास ८३ विमानांच्या माध्यमातून चार स्क्वाड्रनएवढी विमाने मिळतील.
Join Our WhatsApp Community