पाकिस्तान सतत भारतविरोधी कुरघोडी करतच असतो. त्यामुळे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेलगत नवीन एअरबेस म्हणजे हवाई तळ उभारत आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे नवा एअरबेस उभारण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत हे एअरफोर्स स्टेशन पूर्णपणे तयार होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गांधीनगरमध्ये आयोजित डिफेन्स एक्सपो 2022 मध्ये डीसा एअरबेसची पायाभरणी केली. पुढील दोन वर्षांमध्ये डीसा हवाई तळ भारताचे नवे एअरफोर्स स्टेशन बनून तयार होईल, अशी माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.
( हेही वाचा: PFI च्या पदाधिका-यांसह तिघांना पनवेल येथून अटक )
डीसा एअरबेस
गुजरातमधील गांधीनगर येथील डिफेन्स एक्स्पोच्या उद्धाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केवळ एक मजबूत देशच जागतिक स्तरावर आपली मजबूत छाप पाडू शकतो. यासाठी आपली व्यावसायिक क्षमता वाढवण्याबरोबरच उच्च दर्जाची उपकरणे आणि तंत्रज्ञानावर भर देणे गरजेचे आहे. वेळोवेळी देशाच्या लष्कराने आपली परिस्थिती दाखवत उपयुक्तता सिद्ध केली आहे.
…म्हणून डिसा एअरबेस महत्त्वाचे
- दक्षिण पश्चिमी एअर कमांडसाठी मोक्याचे स्थान
- महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे
- एअरबेस बांधण्यासाठी एक हजार कोटींची गुंतवणूक
- हवाई दलाच्या ऑपरेशनल रेंजमध्ये विस्तार
- भारत- पाकिस्तान सीमेपासून फक्त 130 किमी अंतरावर
- केंद्र सरकारने नवीन एअरबेस उभारण्याचा निर्णय 2020 मध्ये घेतला होता.