भारतीय नौदलासमवेत सराव करणार ब्रिटनची ‘क्‍वीन एलिझाबेथ’

समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांची सैन्यदले आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणार आहेत.

87

भारतीय नौदलासमवेत सराव करण्यासाठी ब्रिटनच्या शाही नौदलातील ‘एचएमएस क्‍वीन एलिझाबेथ’ या विमानवाहू नौकेचे मुंबईलगतच्या अरबी समुद्रात आगमन झाले आहे. नावाप्रमाणेच भारदस्त असलेल्या या नौकेचे वजन ६५ हजार टन आहे.

एफ – ३५ या लढाऊ विमानांच्या जोरावर ही नौका सभोवतालच्या विस्तीर्ण क्षेत्रावर आपले प्रभुत्व राखते. या नौकेची उंची नायगारा धबधब्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे अवाढव्य डोलारा असूनही ती दिवसाला ५०० सागरी मैल अंतर सहजपणे पार करते. समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांची सैन्यदले आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणार आहेत.

(हेही वाचाः आता महिला करणार लष्कराचे नेतृत्त्व)

‘एचएमएस क्‍वीन एलिझाबेथ’चे भारतात आगमन

भारत- ब्रिटनची तिनही संरक्षण दले २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान कोकणशक्ती अंतर्गत भारतीय व ब्रिटीश युध्दनौका संयुक्त सराव करणार आहेत. यानिमित्त क्‍वीन एलिझाबेथचे भारतात आगमन झाले आहे. चीन सागरी क्षेत्रात आपले स्थान बळकट करण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच सागरी मार्गातून संचाराचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी क्‍वीन एलिझाबेथ २६ हजार सागरी मैलची सफर करीत आहे. या दौ-यात ४०हून अधिक देशांना भेटी देण्यात आल्या. यात प्रामुख्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारतीय नौदलाशी सहकार्य वाढवले जात आहे. यामुळे दोन्ही देशातील लष्करी संबंध दृढ होतील.

भारताचे सामर्थ्य

या सरावात क्‍वीन एलिझाबेथ समवेत भारताचे आयएनएस कोलकात्ता, आयएनएस कोची आणि आयएनएस चेन्नई या विनाशिका, आयएनएस तलवार आणि आयएनएस तेज युध्दनौका, इंधनवाहू आयएनएस आदित्य जहाजही सहभागी होत आहेत. यात अनेक लढाऊ विमाने, हवेत इंधन भरणारे विमान यांचाही समावेश असेल. अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

(हेही वाचाः ड्रिम ॲडव्हेंचर आयोजित हिमालयीन मोहीम यशस्वी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.